अवघ्या 1300 रुपयांमध्ये विकत घेतलेल्या सोफ्यावर बसल्यानंतर काही तरी वस्तू टोचल्यासारखे वाटले, बघितले, तर आश्चर्यकारक…

जुन्या पुराण्या वस्तू लोक सहसा काही विचार न करता आणि नीट न तपासताच भंगार मध्ये देऊन देतात. पण कधी कधी भंगार मध्ये दिलेल्या वस्तू कुणाचेही नशीब बदलू शकतात. कुणालाही लखपती बनवू शकतात आणि नुकतेच असे बघायलाही मिळाले. अमेरिका मध्ये राहणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी एक सोफा विकत घेतलेला. पण त्यांना नव्हते माहीत की 1300 रुपयांचा सोफा त्यांना लखपती बनवेल.

काय आहे पूर्ण गोष्ट ? :- अमेरिकेतील पाल्ट्ज मध्ये राहणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी एकसोबत एक घर भाड्याने घेतले. ते सजवायला त्यांनी लोकांकडून जुन्या वस्तू विकत घ्यायला सुरुवात केली. यातच त्यांनी एक जुना सोफा विकत घेतलेला जो त्यांना 1300 रुपयांत विकण्यात आला. तो सोफा विकत घेताना त्या विद्यार्थ्यांना नव्हते की तो सोफा त्यांना लखपती बनवेल.

स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये शिकणाऱ्या रीसे वेरखोवे, कॉली गास्टी आणि लारा रुस्सो एक दिवस आपल्या भाड्याच्या घरात सोफ्यावर बसले होते तेवढ्यात सोफ्याच्या कोपऱ्यात काहितरी टोचत असल्याचे जाणवले. त्यानंतर सोफ्याची गादी काढली. गादी काढताना त्यांना एक पाकीट मिळाले. त्यांनी ते पाकीट जेव्हा खोलले तेव्हा त्यात त्यांना 70 हजार रुपये मिळाले.

पैसे मिळाल्यावर त्यांनी सोफ्यावरच्या इतर गाद्याही काढायला सुरुवात केली तर प्रत्येक गादिखाली त्यांना असेच पाकीट मिळायला लागले. जे सगळे पैशाने भरलेले होते. सगळ्या पाकिटातील पैसे मोजल्यावर तर ते चकीत झाले. कारण सोफ्यातून तिघांना जवळपास 40 लाख रुपये मिळाले.

हे पैसे मिळाल्यानंतर तिघांनी पैसे मोजताना खूप फोटो काढले. याचदरम्यान त्यांना एक बँक स्लिप ही सापडली. ज्यात त्या पैशाच्या मालकाबद्दल माहिती लिहिलेली होती. त्यावरून त्या तिघांना कळले की, हे पैसे कुणालातरी बँकेत जमा करायचे होते पण ते करू नाही शकला.

पैशाचा मालकाचा शोध सुरू केला : –

बँक स्लीपच्या आधारे तिघांनी पैशाच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना पैशाच्या मालकाच्या घराचा पत्ता ही लागला. त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले. तेच त्यांना घरी दिसले की तिथे वृद्ध महिला एकटीच राहत होती. जेव्हा तिघांनी तिला पैशाबद्दल विचारले तर तिने सांगितले की, ते पैसे तिच्या पतीचे होते जे त्याला रिटायरमेंट नंतर मिळाले होते. ते पैसे बँकेत जमा करायचे होते पण ते करता आले नाही. म्हणून त्या महिलेने ते पैसे सोफ्यात लपवून ठेवले होते.

त्या महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलांनी तिला न सांगताच हा सोफा विकला होता. जेव्हा सोफा विकला तेव्हा हा पैसा सोफ्यात होता आणि त्याबद्दल मुलांना काही माहिती नव्हती. महिलेचे बोलून ऐकून त्या तिघांनी तिला सगळे पैसे परत करून दिले. त्या महिलेने त्यांच्या इमानदारीवर खुश होऊन त्यांना एक हजार डॉलर बक्षीस म्हणून दिले.

मित्रांनो असेच छान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहचवत राहू .

 

एम्बुलन्स च्या गाडीवर AMBULANCE शब्द हा उल्टा का लिहलेला असतो ? जाणून घ्या याचे कारण ..

आंब्याच्या पानांमध्ये असतात आयुर्वेदिक गुणधर्म, मुळापासून नष्ट करतात ह्या रोगांना…