“जैश-ए-मोहम्मद” संघटना जिने Pulwama Attack घडवून आणला.

१४ फेब्रुवारीला झालेल्या Pulwama Attack मुळे अख्खा भारत हादरून गेला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला होणे ही काय नवीन गोष्ट नाही पण पुलगाम येथील हल्ल्याची तीव्रता इतकी होती की तब्बल केंद्रीय राखीव दलाचे तब्बल ४० जवान मृत्युमुखी पडले. यानंतर “जैश-ए-मोहम्मद” नावाच्या संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे पण कोणाची आहे ही संघटना? कसा झाला तिचा जन्म ??

Pulwama Attack घडवून आणणाऱ्या जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) ह्या संघटनेला “सर्वात क्रूर” आणि “जम्मू-काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी संघटना” म्हणून ओळखले जाते. पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, संयुक्त अरब अमीरात (UAE), युनायटेड किंगडम (UK), संयुक्त राज्य अमेरिका(USA)आणि संयुक्त राष्ट्रांनी(UN) ह्या सर्वांनी मिळून हा गट दहशतवादी संघटना गट म्हणून घोषित केला आहे.

जी.ए.म चा मुख्य उद्देश कश्मीर स्वातंत्र्य करणे आणि पाकिस्तानात विलीन करणे हा आहे, खरे तर कश्मीरला ते भारतीय “प्रवेशद्वार” समजतात, एकदा कश्मीर मुक्त केल्यावर, भारतीय महाद्वीपा मधून हिंदू आणि इतर गैर-मुस्लिमांना संपवून टाकण्याच्या हेतूने भारताच्या इतर भागांमध्ये जिहाद चालविण्याचा मुख्य हेतू जैश-ए-महोम्मद चा आहे. कराची मधील एका भाषणात जे.ए.म नेते मसूद अझर यांनी भाषण केले त्यात ते म्हणले होते की, “जिहादसाठी विवाह करा, जिहाद साठी मुलांना जन्म द्या आणि अमेरिका आणि भारत यांना क्रूरपणे संपवण्यासाठीच केवळ जिहाद. पैसा ही केवळ जिहाद साठी कमवा.”

पाकिस्तानच्या आंतर-सेवा गुप्तचर (आय.एस.आय) ने स्वतः च हरकत-उल-मुजाहिदीन शी संबंधित असलेल्या अनेक देवबंदी दहशतवाद्यांबरोबर काम करून जैश-ए-मोहम्मद तयार केले आहे असे समजते.

जैश ची स्थापना:

जे.ए.म. चा स्थापक आणि नेता (अमीर) मौलाना मसूद अझहर (Maulana Masood Azhar), जो आधी हरकत-उल-मुजाहिदीन चा नेता होता. तालिबान संस्थापक मुल्ला उमर त्याच धार्मिक स्थळीं (कराचीमध्ये जामिया उलूम-उल-इस्लामिया) प्रशिक्षण घेतल्याने तालिबान आणि अल कायदा यांच्याशी त्याचा दीर्घकाळ संबंध होता.

त्यांनी अफगाणिस्तानमध्ये लढा दिला आणि चेचन्या, मध्य आशिया आणि सोमालिया येथे ‘हरकत’ संघटना स्थापना केली, त्याने सोमालिया येथील लोकांना प्रशिक्षण दिले की, अमेरिकेच्या ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर ला कसे पाडावे. २०१० मध्ये अझहर ला अमेरिकेने ‘ग्लोबल टेरीरिस्ट’ म्हणून घोषित केले. १९९९ च्या अखेरीस,पाकिस्तानी अहमद रशीद यांचे म्हणणे होते की, काश्मीरमध्ये परराष्ट्र धोरणाचा एक वैध भाग म्हणून ‘जिहाद’ आहे त्या मुळेच काश्मीर ला स्वातंत्र्य मिळेल.

१९९०च्या दशकाच्या मध्यात ‘हरकत’ हे “दहशतवाद कृत्ये” करण्यासाठी आय.एस.आय समर्थना ने स्थापित करण्यात आले होते. अमेरिकेने १९९८ मध्ये त्यांना दहशतवादी गट घोषित केले आणि अफगाणिस्तानात त्यांच्या अनेक प्रशिक्षण शिबिरावर बंदी घालून तेथे अनेक हल्ले केले. जगभरातील विश्लेषकांचा म्हणणे आहे की १९९९ च्या आसपास पाकिस्तानी आंतर-सेवा गुप्तचर (आय.एस.आय) ने जी.ए.म.(जैश) चा वापर काश्मीर मध्ये लढण्यासाठी केला होता आणि त्यास हवा तो पाठिंबा सुद्धा ते देत होते.

२००२ पासून जैश ए महोम्मद ला पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे बंदी घातली गेली असली तरी ते पाकिस्तानातील सर्व सुविधा खुल्या पणे वापरत आहेत हे उघड सत्य आहे. या गटा मध्ये मोठ्या प्रमाणावर हरकत-उल-मुजाहिदीन च्या माजी सदस्यांमधून, तसेच अल-कायदा मधील मोठ्या प्रमाणात लोकांना जी.ए.म(जैश) ची सदस्यता अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये देण्यात आली.

जैश इ महोम्मद च्या धुडगूस रक्तपात कार्यवाहीची सुरुवात:

२० एप्रिल २००० रोजी, जी.ए.म. ने काश्मीरमध्ये पहिला आत्मघाती बॉम्बफेक हल्ला केला, भारतीय सैन्याच्या बॅरमध्ये बॉम्ब स्फोट करण्यात आला ज्यात पाच भारतीय सैनिक ठार झाले होते. ऑक्टोबर २००१ मध्ये, जैश ने जम्मू-काश्मीर विधानसभे च्या जवळ च बॉम्ब स्फोट केला, त्यात ३८ निष्पाप लोक ठार झाले आणि त्या हमल्या ची जवाबदारी सुध्दा जैश ने स्वतः वर घेतली.

नंतर अगदी दोनच महिन्यात डिसेंबर २००१मध्ये, जैश आणि इतर दहशतवाद्यांनी मिळून भारतीय संसदेवर एक फिदायीन हल्ला केला ज्यात ८ सुरक्षाकर्मी मारले गेले ह्या हल्ल्याची जवाबदारी पण त्यांनी घेतली पण नंतर ISI च्या दबावाला बळी पडून जवाबदारी नाकारली, संसदेवरचा हल्ला जरी निष्फळ ठरला तरी इतकी सुरक्षा भेदून ते घुसू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. ह्याचा सूत्रधार अफझल गुरू ला ह्यात भारत सरकार कडून फाशी देण्यात आली.

वाढत्या दबावामुळे अमेरिका ,भारता कडून कडवा विरोध होत असताना आणि चारी बाजूने नाक दाबले जात असतानाआता जैश ए महोम्मद मध्ये गटबाजी चे राजकारण झाले, सदस्यांच्या विरोधामुळे, जी.ए.म दोन गटांमध्ये विभागला गेला. तीन कमांडर म्हणजेच अब्दुल जब्बर, मौलाना उमर फारूक आणि अब्दुल्लाह शाह मजहर यांनी गट सोडला आणि जमात ‘उल-फुरकान’ गटाची स्थापना केली.तर मसूद अझहर बरोबर राहिलेल्या उर्वरित गटाला ‘खुद्दम-उल-इस्लाम’ हे नाव ठेवले.

सतत जम्मू काश्मीर मध्ये छोट्या मोठ्या कारवाया त्यांच्या चालुच होत्या. नरेंद्र मोदींच्या भेटी नंतर एका आठवड्यात लगेच म्हणजेच, जानेवारी २०१६ मध्ये, पठाणकोट येथील हवाईतळा वर हल्ला केला ज्यात सात सुरक्षारक्षक मारले गेले. अफगाणिस्तान मधील माझार-ए-शरीफ येथील भारतीय दूतावासवर सुध्दा लगेच हल्ला झाला. ह्या नंतर पाकिस्तान ने सुद्धा मदत करू असे पोकळ आश्वासन दिले ते फक्त अमेरिकेला घाबरूनच. सप्टेंबर २०१६ मध्ये, दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये नियंत्रण रेषे जवळ असलेल्या उरी येथे असलेल्या भारतीय-ब्रिगेड मुख्यालयातच हल्ला केला.

या हल्ल्यात झोपेतच १९ सैनिकांचा मृत्यू झाला, ह्याचे वर्णन दोन दशकातील सर्वात घातकहल्ला असे अनेक तज्ज्ञांनी केला होते. आणि ह्याचे उत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान भूमीत घुसून ‘सर्जीकल स्ट्रइक’ करून दहशतवादी अनेक बेस उडवले. आणि अगदी काल च, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जयश-ए-महोम्मद नी कश्मीर मधील अवंतीपोरा जवळ असलेला लठपोरा येथील आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि किमान ४० भारतीय कर्मचारी ठार केले. सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्सच्या कर्मचार्यांना घेऊन जाणारी बस त्यांनी ३५० किलो विस्फोटकांनी उडवून दिली.

ज्या मोठ्या गोष्टींचे आमिष दाखवून कोवळ्या मुलांना दहशतवादी केले जाते, ते शब्द ‘अमन’ ,’शहादत’, ‘शांती’, ‘मुक्ती’, ‘चैन’, ‘ईबादत’, ‘जन्नत’ ह्याचे खरे अर्थ ह्या हैदोस घालणाऱ्या, रक्तपात करणाऱ्या, माणुसकी चा अंश नसणाऱ्या राक्षसांना कधीच समजणार नाही.

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा की नाही, केल्यास काय असतील परिणाम ?

पुलवामा येथील भ्याड हल्याचा “मास्टरमाइंड” भारताच्या तावडीत होता, पण त्याला सोडावे लागले कारण…