बीहड़चे ‘राजा’ डाकू मलखान सिंह बोलला ,’सरकार म्हंटले तर ७०० सहकाऱ्यांच्या सोबत पाकिस्तान ला धडा शिकवू’

१.डाकू मलखान सिंह ज्याने बिहाड वर राज्य केलेले. ज्याच्या गोळ्यांच्या आवाजाने लोक थरथर कापत असत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर बोलताना मलखान सिंह म्हणाला की, एमपी मध्ये 700 बागी उरले आहेत. शासनाने होकार दिला तर विना शर्त, विना पगार आम्ही देशासाठी सीमेवर मारण्यास तयार आहे.

२.मलखान सिंह बोलला आमच्या कडून लेखी लिहून घ्या की, आम्ही मारले गेलो तरी काही हरकत नाही. उरलेले आयुष्य आम्ही पणाला लावण्यास तयार आहे. यात मागे हटलो तर नावाचा मलखान सिंह नाही.

३.मलखान सिंह म्हणाला, आम्ही अनाडी नाही 15 वर्षांची कथा आहे जर आई भवानीची कृपा राहिली तर मलखान सिंहचा केसाला ही धक्का लागणार नाही. आमची इच्छा आहे की, आम्हाला सीमेवर पाठवावे. जर मला तिकीट मिळाले तर मी लोकसभा निवडणूक नक्की लढवेल.

४.मलखान सिंह शहिदांच्या श्रद्धांजली सभेत सहभागी व्हायला कानपुरला आला होता. ते म्हणाले की, जेव्हा राजकीय पक्ष वचने देतात तेव्हा ते हरतात. वचन दिले होते तर मध्य प्रदेश हरलेले. लोकसभा निवडणुकीत खोटे वचने दिली तर हरणार. ते बोलले की, निवडणूका होतात आणि होत राहतील पण पुलवामा हल्ल्याचा बदला नक्की घेतला पाहिजे. जर काश्मीर बाबतीत निर्णय नाही घेतला तर कुणीच राजकारणावर विश्वास ठेवणार नाही.

५.मलखान सिंह म्हणाले की, देशातील सगळ्या नेत्यांनी लोकसभा गृहात बैठक घेतली पाहिजे आणि पाकिस्तान विरोधात एक महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. पाकिस्तान मध्ये घुसून त्यांच्या चिंधड्या उडवण्याची वेळ आली आहे. ते बोलले की, २ आतंकवाद्यांना मारण्यासाठी देशाला ५ सुपुत्र गमवावे लागले.

६.मलखान सिंह सांगितले की, जेव्हा मी 1982 मध्ये शरणागती पत्करली तेव्हा अर्जुन सिंह मुख्यमंत्री होते. ही शरणागती इंदिरा गांधींच्या परवानगीने झाली होती. शरणागती वेळी मी व्यासपीठावरून जाहीर केले होते की, तिन्ही प्रांतातील कुठली स्त्री म्हणेल की, मलखान सिंहने चांदीची अंगठीही काढली असेल तर याच व्यासपीठाच्या समोर फासावर लटकून द्यावे.

७.मलखान सिंहने सांगितले की, आम्ही अन्यायाविरुद्ध लढू पोट भरण्यासाठी राजकारण नाही करणार. आमची पहिली प्राथमिकता विकास आहे. जर जनतेच्या समस्या सुटल्या नाही तर मग लोकसभेत बसा किंवा विधानसभेत बसा काहीच होणार नाही.

८.मलखान सिंह बोलले की, बिहाड मध्ये माझा इतिहास एकदम साफ राहिला आहे. बागिंचा इतिहास एकदम ठोस राहिला आहे इतका तर साधू संतांचा पण राहत नाही. साधू तर घेऱ्यात येऊन कुकर्माची शिक्षा भोगत जेलमध्ये पडून आहेत. पण बागिंच्या बाबतीत सांगा कुणी असे. आम्ही गाव आणि जिल्ह्याचे बागी राहिलो आहोत पण देशाचे बागी कधीच झालो नाही.

आंब्याच्या पानांमध्ये असतात आयुर्वेदिक गुणधर्म, मुळापासून नष्ट करतात ह्या रोगांना…

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा की नाही, केल्यास काय असतील परिणाम ?